Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhayandar: उत्तन समुद्र किनाऱ्यावर आढळला तब्बल 100 किलो वजनाचा ‘पाकट’मासा ; पाहा फोटो
भाईंदरच्या उत्तन येथील भाटेबंदर समुद्र किनाऱ्यावर दोघा भावांना तब्बल शंभर किलो वजनाचा पाकट मासा सापडला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाघ्या पाकट नावाचा हा मासा समुद्रात क्वचितच सापडतो.
उत्तनच्या भाटेबंदर किना-यावर सुनील याची एकवीरा आई ही इंजिन नसलेली लहान बोट आहे. ही बोट समुद्र किनारी चिखलात मासेमारी करते. या ठिकाणी फक्त lopster (शिवंडा) च गळाला लागतात त्या ठिकाणी हा मासा सापडला. या माशाचे वजन तब्बल 100 किलो इतके असून ह्या माशाने सुनील यांना 15 हजार रुपये एवढी किंमत मिळू शकते.
हा मासा मुंबईतील व्यापाऱ्यांना विकण्यात येणार असल्याचे सुनील यांनी सांगितल आहे.
पाकट माशाचे मांस हे खाल्ले जाते. त्याच्या यकृतापासून आणि शरीरापासून तेल मिळते. त्याला यकृत तेल आणि शरीर तेल म्हणतात.
यकृत तेलात अ आणि ड ही जीवनसत्त्वे असतात. शरीर तेलाचा उपयोग वंगण, खाद्यतेल आणि साबण तयार करण्यासाठी केला जातो.
तर पाकट माशाच्या त्यांच्या त्वचा वापर विविध प्रकारे केला जातो.
पाकट माशांना इंग्रजीमध्ये Stingray Fish असं म्हटलं जातं.
पाकटाच्या नांगीने केलेल्या इजांमुळे माणसे जखमी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.