Bandra Terminus Stampede PHOTOS : वांद्रे स्थानकावर नेमकं काय घडलं? इतकी मोठी चेंगराचेंगरी कशी झाली?
मुंबईतील वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये चढताना अचानक प्रवाशांची गर्दी वाढली आणि गोंधळ उडाला. वांद्रे-गोरखपूर ट्रेनमध्ये चढत असताना ही घटना घडली, ज्याचं रुपांतर पुढे चेंगराचेंगरीत झालं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवांद्रे स्थानकावरील चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
चेंगराचेंगरीत 9 प्रवासी जखमी झाले, ज्यांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यातील 7 जणांची प्रकृती स्थिर असून 2 दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.
या दुर्घटनेतील जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या घटनेचे मन हेलावणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थानकावर नेमकं काय घडलं? : वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थानकावर रविवारी मध्यरात्री चेंगराचेंगरी झाली. मध्यरात्री 02.45 च्या सुमारास पॅसेंजर ट्रेन क्रमांक 22921 अंत्योदय एक्स्प्रेस (वांद्रे-गोरखपूर एक्स्प्रेस) यार्ड वरून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 कडे हळूहळू येत होती.
ही ट्रेन पहाटे 5:10 वाजता प्लॅटफॉर्मवरुन सुटणार होती. 2 तास आधीच ट्रेन प्लॅटफॉर्मवर लागली होती. परंतु ही ट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबत नाही तोवर प्रवाशांनी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला.
ट्रेनमध्ये चढता-चढता 02 प्रवासी खाली पडले आणि चेंगराचेंगरीत जखमी झाले. या प्रवाशांवर आणखी प्रवासी येऊन पडल्याने स्टेशनवर गोंधळ उडाला आणि आणखी 07 प्रवासी जखमी झाले.
या ट्रेनचे सर्व डबे अनारक्षित होते. आपल्याला सीट मिळावी यासाठी लोकांनी एकच गोंधळ केला. दिवाळी आणि छट पूजेसाठी गावी जाण्यासाठी गर्दी उसळली होती.
दिवाळी आणि छट पूजा असल्याने युपी-बिहारमध्ये जाणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड होती. त्यात वांद्रे-गोरखपूर एक्स्प्रेसचे सर्व डबे जनरल कॅटेगरीचे होते, त्यात रिझर्व्हेशन नव्हतं, त्यामुळे सीट पकडण्याच्या घाईत ही दुर्घटना घडली.
यातील दोघांची प्रकृती गंभीर असून सध्या 7 जणांची प्रकृती स्थिर आहे.