PHOTO : मुंबई पोलिसांच्या ताफ्यात शानदार अत्याधुनिक ATV, काय आहे या गाडीची खासियत?
मुंबई शहरातील नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी गस्त घालण्यासाठी मुंबई पोलीस दलास विशेषतः चौपाटी परिसरातील गस्तीसाठी सुसज्ज व अत्याधुनिक अशी एटीव्ही (ऑल टिरेन व्हेईकल्स) वाहने ताफ्यात दाखल झाली आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत ही वाहनं प्रदान करण्यात आली.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ही दहा वाहने मार्गस्थ करण्यात आली. रिलायन्स फाऊंडेशनच्यावतीने ही वाहने देण्यात आली आहेत.
या वाहनाला सर्वपृष्ठीय वाहन असे म्हणू शकतो. एखादी अघटीत घटना घडल्यास तत्काळ मदतीसाठी पोहचण्यासाठी या वाहनाचा वापर करता येतो. (फोटो क्रेडिट-@MumbaiPolice)
त्यासाठी ही वाहने मुंबई पोलीसांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. (फोटो क्रेडिट-@MumbaiPolice)
हे एक सर्व समावेशक असे वाहन आहे. ते जमीन, रेती, दलदलीचा भाग, वालुकामय अशा सर्व पृष्ठभागावर चालते. (फोटो क्रेडिट-@MumbaiPolice)
त्यामुळे चौपाटी परिसरात याचा वापर करता येऊ शकतो. वाहनाची 570 सीसी अशी उच्च क्षमता आहे.
त्यामुळे ते वेगवानही आहे. बंदोबस्तावरील चार जण या वाहनातून गस्त घालू शकतात. आणीबाणीच्या प्रसंगी वाहनातील दोरखंड, तरंगते हूक्स (Floating Hooks) अशा सुविधांचाही वापर करता येऊ शकतो.