Lalbaugcha Raja : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लालबाग राजाच्या चरणी, पत्नीसह घेतलं दर्शन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईत विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरवर्षीप्रमाणे त्यांनी आज लालबागच्या राजाचे दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.
मुंबईतील लालबाग काळाचौकी पोलीस ठाणे पासून ते लालबागचा मुख्यद्वार पर्यंत सीआरपीएफ मुंबई पोलीस, रॅपिड ऍक्शन फोर्स तसेच लालबाग परिसरामधील पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
लालबाग परिसरामध्ये गणेश भक्तांची गर्दी झाल्यामुळे संपूर्ण रस्ता मोकळा करण्यात आला. त्यानंर अमित शाह यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतलं.
त्यानंतर अमित शाह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरी गणेशाचं दर्शन घेतलं.
गृहमंत्री अमित शहा यांच्या दौरा असलेल्या सर्व मार्गावर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे.
त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या निवासस्थानी जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात स्वागतसाठी बॅनर लावण्यात आलेले आहे.
त्याचबरोबर मुंबई पोलीस सुद्धा सहज झाली असून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त येणार आहेत. आणि मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानाजवळ असलेला मार्ग हा झिरो पार्किंग करण्यात आलेला आहे.
अमित शाह यांनी त्या आधी आशिष शेलारांच्या वांद्रेमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात उपस्थिती लावली आणि त्या ठिकाणी गणेशाचं दर्शन घेतलं.