Maharashtra Politics: दादरमध्ये शिंदे गटाकडून बॅनरबाजी; सावरकरांच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंवर निशाणा

दादरमध्ये ठाकरे गटाला डिवचणारे बॅनर शिंदे गटाच्या वतीने लावण्यात आलेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शिवसेना भवन, शिवाजी पार्क, दादासाहेब फाळके रोड आणि इतर परिसरात बॅनर लावण्यात आले होते.

या बॅनरला परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी तात्काळ बॅनर हटवले आहेत.
सत्तेसाठी आहेत लाचार, सोडून दिला सावरकरांचा विचार, आम्हाला आहे बाळासाहेबांची साथ, सावरकर विरोधकांच्या घालू पेकटात लाथ, अशी बॅनरबाजी शिंदे गटाच्या वतीनं शिवाजी पार्क परिसरात करण्यात आली.
आम्ही सावरकर यात्रा शिवसेना आणि भाजपच्या वतीनं सर्वत्र काढण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटावर निशाणा साधणारे हे बॅनर सर्वत्र लावण्यात आलेले आहेत.
शिंदे गटाकडून दादर परिसरातील शिवसेना भवन, शिवाजी पार्क, दादासाहेब फाळके रोड आणि इतर ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली होती.
शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या बॅनरबाजीला परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी तात्काळ बॅनर हटवले आहेत.