MLA Anil Babar Passed Away : आमदार 'अनिल बाबर' यांचे आकस्मित निधन; वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...
खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे आज अकस्मात निधन झाले. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Photo credit : Facebook/@Anil Babar)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appन्यूमोनिया झाल्याने त्यांना सांगलीतील रुग्णालयात मंगळवारी दुपारी दाखल करण्यात आलं होतं. (Photo credit : Facebook/@Anil Babar)
रोखठोक भूमिका मांडणे यासाठी अनिल बाबर कायम ओळखले जायचे. आज त्यांच्या जाण्याने खानापूर मतदारसंघासह राजकीय क्षेत्रातही शोककळा पसरली आहे. (Photo credit : Facebook/@Anil Babar)
पश्चिम महाराष्ट्रात अनिल बाबर यांची पाणीदार आमदार अशी ओळख आहे. तसा खानापूर-आटपाडी हा मतदारसंघाला दुष्काळग्रस्त. कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते. 2014 ते 2019 च्या युती सरकारच्या काळात टेंभू योजनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. (Photo credit : Facebook/@Anil Babar)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी अशी अनिल बाबर यांची ओळख होती. शिवसेनामध्ये उभी फूट पडल्यानंतर अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. (Photo credit : Facebook/@Anil Babar)
महाविकास आघाडीवर उघडपणे नाराजी व्यक्त करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडात खंबीरपणे साथ दिली. त्यामुळे गुवाहाटी वारीत अनिल बाबर हे सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबतच होते. ठाकरे गटाकडून अपात्रतेप्रकरणी जी नावं दिली, त्या यादीत अनिल बाबर यांचं नाव आघाडीवर होतं. (Photo credit : Facebook/@Anil Babar)
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या 19 व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं होतं. खानापूर तालुक्यातील गर्दी गावाचे सरपंच म्हणून ते निवडून आले होते. (Photo credit : Facebook/@Anil Babar)
2019 मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यांनी अपक्ष उभे राहिलेल्या सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. 1990, 1999, 2014, 2019 असे चार वेळा ते आमदार राहिलेत. (Photo credit : Facebook/@Anil Babar)
15 वर्ष शरद पवारांसोबत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम केले. त्यानंतर 2014 मध्ये अनिल बाबर यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला होता. 2019 च्या महाविकास आघाडीच्या सरकारवेळी मंत्रिपदासाठी अनिल बाबर यांच्या नावाची चर्चा होती. पण त्यावेळी त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्येही मंत्रिपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा होती. (Photo credit : Facebook/@Anil Babar)
सांगलीच्या खानापूर-आटपाडीमधून अनिल बाबर चार वेळा आमदार म्हणून निवडणूक आले होते. अनिल बाबर पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे. 1999 ते 2014 अशी तब्बल 15 वर्षे ते पवारांसोबत होते. पण 2014 साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. (Photo credit : Facebook/@Anil Babar)