Meri Maati Mera Desh : 'मेरी माटी मेरा देश' या संकल्पनेत उमेश जाधव यांचे आगळेवेगळे योगदान , पाहा फोटो
मेरी माटी मेरा देश या संकल्पनेत उमेश जाधव यांचे आगळेवेगळे योगदान दिले आहे. लाखो किमीचा प्रवास करून त्यांनी 180 शहिदांच्या घरची माती गोळा केली आहे.

Meri Maati Mera Desh
1/8
'मेरी माटी मेरा देश' या संकल्पनेत उमेश जाधव या सर्वसामान्य नागरीकानंही आपलं बहुमोल योगदान दिलंय.
2/8
देशभरात लाखो किमीचा प्रवास करून 180 शहिदांच्या घरची माती उमेश जाधव यांनी गोळा केलीय.
3/8
कुठल्याही स्पॉन्सरशिरविना त्यांनी आपली ही मोहिम पूर्ण केलीय हे विशेष.
4/8
पुलवामा हल्यानंतर या अनोख्या श्रद्धांजलीची संकल्पना त्यांच्या डोक्यात आली.
5/8
त्यांच्या या प्रवासात त्यांनी ज्या ज्या आर्मी मुख्यालयात त्यांनी भेट दिली त्या ठिकाणी उमेश यांचा आर्मी बॅच देऊन गौरव करण्यात आला.
6/8
ही अनोखी संकल्पना करण्याकरता त्यांनी एका चार चाकीच्या भोवती या संकल्पनेबाबत माहिती लिहिली आहे.
7/8
या गाडीला त्यांनी हार आणि तिरंगा लावून सजवले आहे.
8/8
सोबतच या गाडीला त्यांनी हेलमेट आणि गन लावून देखील सजावट केलेली आहे.
Published at : 26 Oct 2023 03:34 PM (IST)