Chandra Grahan 2023 : लवकरच होणार चंद्रग्रहण, भारतात कधी दिसणार? सुतक काळ जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रात ग्रहणाचे विशेष महत्त्व आहे. चंद्रग्रहण ही खगोलीय घटना आहे, पण धर्म आणि ज्योतिषशास्त्रात ती शुभ मानली जात नाही. या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर रोजी शरद पौर्णिमेच्या रात्री होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App28 ऑक्टोबर रोजी होणारे हे चंद्रग्रहण मेष राशीत होणार आहे. हे ग्रहण आंशिक चंद्रग्रहण असेल आणि ते भारतातही दिसेल. 28 ऑक्टोबर रोजी होणारे हे ग्रहण भारतात मध्यरात्री 01:05 पासून सुरू होईल आणि पहाटे 02:24 पर्यंत राहील.
हे ग्रहण भारतातही दिसणार आहे, त्यामुळे त्याचा सुतक काळही मानला जाईल. हे चंद्रग्रहण भारतासह आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि हिंद महासागर, पॅसिफिक, अटलांटिक, आर्क्टिक आणि अंटार्क्टिकामध्ये दिसणार आहे.
चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी ग्रहणाच्या ठीक ९ तास आधी सुरू होतो. 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:15 वाजता चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी सुरू होईल. सुतक काळात सर्व मंदिरांचे दरवाजे बंद असतात. सुतक दरम्यान कोणतीही पूजा किंवा धार्मिक विधी केले जात नाहीत.
धार्मिक मान्यतांनुसार, ग्रहण काळात वेगाने जाणारा चंद्र हा छाया ग्रह केतूच्या अशुभ प्रभावाने ग्रस्त असतो.
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहणाच्या वेळी चंद्राचा प्रभाव मानवावर पडतो. त्याच्या प्रभावामुळे कुंडलीतील चंद्राची स्थिती कमजोर होते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)