Asia Cleanest Village Photos : 'हे' आहे आशिया खंडातील सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर गाव
Asia Cleanest Village : आशिया खंडात एक असे गाव आहे जे सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर आहे.याठिकाणी स्वच्छता झाली नाही तर जेवण मिळत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशात दिवसेंदिवस प्रदुषण वाढत आहे. जगातील प्रत्येक माणूस याचा शिकार होतो आहे. अशातच भारतातील मेघालयमध्ये एक असे गाव आहे.ज्याची सुंदरता लोकांना आकर्षित करत आहे.
हे गाव मेघालयची राजधानी शिलॉन्ग पासून 90 किमी दूर आहे.या गावाचे नाव आहे मौलिन्नोंग. लोक याला मिनी स्विझरलँडही म्हणतात.
2003 साली डिस्कवर इंडिया मॅगझीनने मौलिन्नोंग हे आशिया खंडातील सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर गाव म्हणून सांगण्यात आले होते.
15 वर्षांपूर्वी 1988 साली मौलिन्नोंग गावात एक महामारी आली होती. त्यानंतर दरवर्षी या गावात महामारी येत होती.या महामारीमध्ये लहान मुलांचा सगळ्यात जास्त जीव जात होता.
अखेर येथील शाळेतल्या शिक्षकांनी या महामारीच्या विरोधात लढण्याचा निश्चय केला.लोकांना साफ-सफाई करण्यासाठी जागरुक केले.
प्लॅस्टिकच्या वापरावर या गावात निर्बंध लावण्यात आला आहे.याठिकाणी तुम्ही थुंकू शकत नाही. धुम्रपान करू शकत नाहीत.
या नियमांचे पालन केल्यास दंडाची तरतूदही करण्यात आली होती. गावातील प्रत्येक नागरिक स्वत: स्वच्छ करण्याबरोबरच घराबाहेरील रस्ता स्वच्छ करण्याची जबाबदारी घेतो. येथे, जर एखाद्या व्यक्तीने साफसफाईमध्ये सहभाग घेतला नाही तर त्याला अन्न मिळत नाही.
येथे नदीचे पाणी इतके स्वच्छ आहे की ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. नदीत अनेक फूट खाली पडलेले दगडही स्पष्ट दिसतात. जगातील सर्वात स्वच्छ नदीमध्ये तिची गणना होते.
या नदीचे नाव डौकी आहे. त्यात घाणीचा एक कणही दिसत नाही. सध्या नदीत असलेल्या बोटीकडे पाहिल्यावर असे वाटते की ती पाण्यावर नाही तर हवेत तरंगत आहे.