Manish Sisodia : मनिष ससोदिया यांना ईडीने केली अटक
आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीच्या एक दिवस आधी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्ली अबकारी धोरण प्रकरणी सीबीआयने सिसोदियांना गेल्या महिन्यात 8 तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर अटक केली होती.
विशेष म्हणजे, अटकेपूर्वी ईडीच्या पथकाने लिकर पॉलिसी केस म्हणजे मद्य धोरण प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री सिसोदिया यांची तिहार तुरुंगात चौकशी केली होती.
दिल्ली लिकर पॉलिसी केसप्रकरणी ईडीला कोर्टाकडून तीन दिवसांच्या चौकशीची परवानगी मिळाली आहे.
आज ईडीने कारागृहात चौकशीसाठी तुरुंग प्रशासनाशी संपर्क साधला होता.
मंगळवारीही ईडीने तुरुंगात सिसोदिया यांची चौकशी केली होती. आज त्यांना अटक करण्यात आली आहे.
दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी दिल्लीतील मद्य धोरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर सीबीआयने मनी लाँड्रिंगप्रकरणी मनिष सिसोदिया यांची दोन दिवस चौकशी केली.
आता अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने मनिष सिसोदिया यांना अटक केली आहे.