Gold Rate Today : अवघ्या 24 तासात सोने दरात 1000 रुपयांची घसरण, जळगावात तोळ्याचा भाव किती?
जागतिक पातळीवर फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ युनायटेड स्टेटच्या वतीने ठेवीवर देण्यात येणाऱ्या व्याजदरात वाढ होण्याची शक्यता पाहता त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजळगावच्या सुवर्ण नगरीत गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोने खरेदी करु पाहणाऱ्या ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
अर्थसंकल्पानंतरच्या काळाचा विचार केला तर सोन्याच्या दरात सातत्याने दर वाढ झाली असल्याचं पाहायला मिळाले होते.
जीएसटीसह 60 हजार रुपये इतकी मोठी उच्चांकी दरवाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांसाठी सोने खरेदी करणे अवाक्याबाहेर गेले होते.
मात्र गेल्या पंधरवड्यापासून सोन्याच्या दरात सातत्याने कमी अधिक प्रमाणत घसरण सुरु असल्याचं पाहायला मिळत असून गेल्या चोवीस तासात तब्बल एक हजार रुपयांची घसरण झाली आहे.
त्यामुळे जीएसटीशिवाय दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर 56 हजार 300 रुपयांवरुन 55 हजार 300 रुपयांवर आल्याने सर्वसामान्य ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
जागतिक पातळीवर युनायटेड रिझर्व बँकेच्या वतीने ठेवीवर व्याज दर वाढवून देण्याबाबतचे संकेत बैठकीत देण्यात आले. याचा थेट परिणाम म्हणून सोन्याच्या मागणीत घट होऊन सोन्याच्या दरात एकाच दिवसात एका हजार रुपयांची घसरण झाली आहे.
सोन्याचे दर कमी झाल्याने सोने खरेदी करु पाहणाऱ्या ग्राहकांना ही संधी वाटू लागल्याने त्यांचा खरेदीकडे कल वाढला असल्याचं सोने व्यावसायिकांनी म्हटलं आहे.