Mahua Moitra : संसदेतील मुलुखमैदानी तोफ, कोण आहेत महुआ मोईत्रा?
टीएमसी खासदार महुआ मोईत्रा संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या आरोपांवरून चर्चेत आहेत.(Photo : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजप खासदार निशिकांत दुबे यांनी त्यांच्यावर पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचा आरोप केला आहे. या मुद्द्यावर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्रही लिहिले आहे (Photo : PTI)
निशिकांत दुबे यांनी महुआ (Mahua Moitra) यांचे पूर्व पार्टनर जय अनंत देहदराई यांच्या पत्राच्या आधारे हे आरोप केले आणि चौकशीची मागणी केली आहे.(Photo : PTI)
महुआ मोईत्रा या संसदेतील आपल्या तडाखेबाज भाषणांमुळे मुलुखमैदानी तोफ म्हणून ओळखल्या जातात.(Photo : PTI)
महुआ एक कुशल वक्ता आणि उत्कृष्ट नेता म्हणून ओळखल्या जातात. महुआ राजकारणात येण्यापूर्वी यशस्वी बँकर होत्या.(Photo : PTI)
महुआ मोईत्रा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या कृष्णनगर मतदारसंघातून टीएमसीच्या तिकिटावर विजयी झाल्या.(Photo : PTI)
महुआचा जन्म 1974 साली आसामच्या कछार जिल्ह्यात झाला. महुआ यांनी आपलं शिक्षण कोलकाता येथून केलं.(Photo : PTI)
प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर महुआ यांना त्यांच्या कुटुंबाने पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवले.(Photo : PTI)
1998 मध्ये मॅसॅच्युसेट्समधीलमाउंट होल्योक कॉलेज साउथ हॅडली येथून अर्थशास्त्र आणि गणित विषयात त्यांनी पदवी प्राप्त केली.(Photo : PTI)
महुआच्या आणखी एका माजी पार्टनरचे नाव सध्या चर्चेत आहे. जय अनंत देहदराई असे या व्यक्तीचे नाव असून ते सर्वोच्च न्यायालयात वकील आहेत. महुआने त्यांच्यावर मानहानीचा खटलाही दाखल केला आहे. सध्या महुआ दिल्लीत एकट्याच राहतात. (Photo : PTI)