Mahatma Gandhi Death Anniversary : सत्य,अहिंसेच्या मार्गावर जीवन व्यतित करणाऱ्या महात्मा गांधी यांची पुण्यतिथी! वाचा बापूंचे 'हे' विचार!
30 जानेवारी 1948 महात्मा गांधी यांची पुण्यतिथी झाली. त्यावेळी महात्मा गांधी यांचे वय 78 वर्ष होते. (Photo Credit : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहात्मा गांधी यांचा स्मृतीदिन हा हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. (Photo Credit : PTI)
गांधींजींचे विचार, जाणून घेऊया... (Photo Credit : PTI)
आपण शांतता प्रस्थापित करण्यासाठी काय विचार करतो, काय बोलतो आणि काय कृती करतो यावर आपलं समाधान अवलंबून आहे. (Photo Credit : PTI)
हिंसेच्या मार्गाने एखादी गोष्ट साध्य होते तेव्हा ते यश तात्पुरतं असतं. पण त्यामुळे होणारं नुकसान मात्र दीर्घकालीन असतं. (Photo Credit : PTI)
मानवतावादावरचा विश्वास ढळू देऊ नका. मानवतावाद हा अथांग समुद्र आहे. या समुद्रातील काही थेंब प्रदूषित असू शकतात, पण त्यामुळे सर्व समुद्र प्रदूषित होऊ शकत नाही. (Photo Credit : PTI)
एखाद्या देशाच्या सभ्यपणाची परीक्षा घ्यायची असेल तर त्या देशात प्राण्यांना कशी वागणूक दिली जाते ते पहा. (Photo Credit : PTI)
मनुष्य हा त्याच्या स्वत:च्या विचारांची निर्मिती आहे. तो कसा विचार करतो त्याचप्रमाणे त्याचं चारित्र्य ठरतं. (Photo Credit : PTI)
जगात बदल घडवायचा असेल तर तो बदल प्रथम स्वत:मध्ये घडवा. (Photo Credit : PTI)
दुर्बल व्यक्ती कधीही कोणाला क्षमा करु शकत नाही. क्षमा करणे हा सामर्थ्यवान व्यक्तीचा गुणधर्म आहे. (Photo Credit : PTI)
प्रतिशोध हा असा गुण आहे जो जगाला आंधळा बनवतो. (Photo Credit : PTI)
अगदी सभ्य मार्गानेही तुम्ही जगाला हादरवून सोडू शकता. (Photo Credit : PTI)
थोडासा संयम हा हजारो उपदेशांपेक्षा अधिक मौल्यवान आहे. (Photo Credit : PTI)