Mahatma Gandhi Death anniversary : महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान मोदी यांनी राजघाटावर वाहिली गांधींना आदरांजली!
30 जानेवारी 1948 महात्मा गांधी यांची पुण्यतिथी झाली. त्यावेळी महात्मा गांधी यांचे वय 78 वर्ष होते. (Photo : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहात्मा गांधी यांचा स्मृतीदिन हा हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. (Photo : PTI)
आज महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान मोदी यांच्याकडून राजघाटावर आदरांजली वाहिली गेली. (Photo : PTI)
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. (Photo : PTI)
गांधींजींचे विचार - एखाद्या देशाच्या सभ्यपणाची परीक्षा घ्यायची असेल तर त्या देशात प्राण्यांना कशी वागणूक दिली जाते ते पहा. (Photo : PTI)
मानवतावादावरचा विश्वास ढळू देऊ नका. मानवतावाद हा अथांग समुद्र आहे. या समुद्रातील काही थेंब प्रदूषित असू शकतात, पण त्यामुळे सर्व समुद्र प्रदूषित होऊ शकत नाही. (Photo : PTI)
आपण शांतता प्रस्थापित करण्यासाठी काय विचार करतो, काय बोलतो आणि काय कृती करतो यावर आपलं समाधान अवलंबून आहे. (Photo : PTI)
हिंसेच्या मार्गाने एखादी गोष्ट साध्य होते तेव्हा ते यश तात्पुरतं असतं. पण त्यामुळे होणारं नुकसान मात्र दीर्घकालीन असतं. (Photo : PTI)
दुर्बल व्यक्ती कधीही कोणाला क्षमा करु शकत नाही. क्षमा करणे हा सामर्थ्यवान व्यक्तीचा गुणधर्म आहे. (Photo : PTI)
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांनी राजघाटावर महात्मा गांधींजींना वाहिली आदरांजली. (Photo : PTI)