Mahatma Gandhi Death Anniversary : नोटांवर गांधीजींचाच फोटो का? जाणून घेऊया काय आहे त्याचा इतिहास...
भारतीय नोटांवर महात्मा गांधीजींचा फोटो आपण सर्वांनी पाहिला आहे. मात्र नोटांवर केवळ गांधीजींचाच फोटो का? याबाबत अनेकदा विचारलं जातं. (Photo Credit : unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशात असंख्य महापुरुष झाले, पण केवळ गांधीजींच नोटेवर दिसतात. भारतीय चलनाची जगात खास प्रतिष्ठा आहे. (Photo Credit : unsplash)
रिझर्व्ह बँकेने सर्व भारतीय रुपयांवर 1996 पासून महात्मा गांधींचा फोटो असलेल्या नोटा बाजारात आणल्या. (Photo Credit : unsplash)
1996 मध्ये महात्मा गांधींचा फोटो असलेल्या नोटांना गांधी सीरिजचं नाव देण्यात आलं. त्याआधी 1969 मध्ये आरबीआयने महात्मा गांधींचा फोटो असलेली नोट जारी केली होती. (Photo Credit : unsplash)
गांधी जयंतीच्या निमित्ताने त्यावेळी गांधीजींचा फोटो असलेल्या छोट्या रकमेच्या नोटा आणल्या होत्या. (Photo Credit : unsplash)
नोटांवर दिसणारा गांधीजींचा फोटो हा तत्कालिन भारतातील ब्रिटीश सेक्रेटरी लॉर्ड फ्रेडरिक पॅथिक लॉरेंन्स यांच्यासोबत 1946 मध्ये झालेल्या भेटी दरम्यानचा आहे. (Photo Credit : unsplash)
प्रसिद्ध फोटोग्राफरने तो फोटो काढल्याची चर्चा आहे, पण तो फोटोग्राफर कोण हे अद्याप समजलेलं नाही. (Photo Credit : unsplash)
या फोटोतील केवळ गांधीजींचा चेहरा नोटांवर छापण्यात आला. सौम्यपणे हसणारे गांधीजी भारतीय नोटांवर दिसतात. (Photo Credit : unsplash)