CSMTवर अवतरली अत्याधुनिक वंदे भारत एक्स्प्रेस; मुंबईहून पंढरपूर-सोलापूर रिटन एका दिवसात शक्य होणार- काय आहे खासियत
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर भारताची सर्वात अत्याधुनिक आणि पूर्णतः भारतीय बनावटीची वंदे भारत एक्स्प्रेस पहिल्यांदाच दाखल झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दहा फेब्रुवारीला दोन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.
त्यासाठी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस आज मुंबईत दाखल झाली.
भारतीय रेल्वेचा ऐतिहासिक वारसा आणि भारतीय रेल्वेची आधुनिकता यांचा दुर्मिळ संगम या ट्रेनमधून पाहायला मिळत आहे.
या दोन वंदे भारत एक्सप्रेस मुळे एका दिवसात शिर्डी आणि पंढरपूर अशा महाराष्ट्रातल्या दोन्ही अतिशय महत्त्वाच्या तीर्थस्थळावर एकाच दिवशी जाऊन दर्शन घेऊन पुन्हा मुंबईला येणे शक्य होणा
सीएसएमटीवरून साईनगर शिर्डीसाठी सकाळी 6.15 वाजता ट्रेन सुटेल आणि तिथे 12.10 ला पोहोचेल, परत तिथून संध्याकाळी 5.25 ला सुटेल आणि मुंबईला 11.18 ला पोहोचेल.
तर सोलापूरसाठी सी एस एम टी वरून 6.05 ला सुटेल आणि सोलापूरला 12.35 ला पोहोचेल, तर सोलापूर येथून संध्याकाळी 4.10 ला सुटेल आणि मुंबईला 10.40 ला पोहोचेल.
या वंदे भारत एक्सप्रेसने मुंबईला येत असतानाच एक इतिहास केला आहे, इतिहासात पहिल्यांदाच एखादी गाडी कोणत्याही प्रकारचे बँकर इंजिन न लावता लोणावळा आणि खंडाळा येथील भोर घाट उतरून आली आहे,
येणाऱ्या काळात देखील या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेस कसारा येथील थल घाट आणि लोणावळा येथील भोर घाट कोणतेही बँकर इंजिन न लावता चालवला जाणार आहेत,
त्यासाठी या अत्याधुनिक अशा ट्रेनमध्ये विशेष पार्किंग ब्रेक्स लावण्यात आले आहेत जेणेकरून उतार आणि चढावर ही गाडी अपघात ग्रस्त होणार नाही