आजही राज्यात पडणार मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. काही भागात मुसळधार तर कुठं हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही ठिकाणी मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. दरम्यान, आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
ज्या भागात चांगला पाऊस झालाय, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या आहेत. तर काही भागात अद्यापही पेरण्या झाल्या नाहीत.
हवमान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज मुंबईसह ठाणे, रागयड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
आजही मुंबईसह (Mumbai) राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट (yellow alert) जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज राज्याच्या विविध भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे
मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात देखील आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.