Pandharpur wari 2024 : अर्थपूर्ण अभंगांसोबतच शीतलताराच्या अप्रतीम सुलेखनकलेचा अनुभव; पाहा फोटो
शीतलतारा कॅलिग्राफीच्या माध्यमातून पंढरपूरच्या वारीची परंपरा आणि संतसाहित्याचे वैभव जगभरात पोहोचवत आहे. मूळची मुंबईकर असलेली शीतल सध्या अमेरिकेतील बोस्टनमध्ये स्थायिक असून गेली 12 वर्ष स्व-अध्ययनातून सुलेखनाचे प्रयोग करत आहे. (PHOTO : @sheetaltara21/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअक्षरकलावारी हा शीतलताराचा वार्षिक उपक्रम असून यामध्ये पंढरपूरच्या वारीच्या काळात दररोज एक अशा प्रकारे 20 संतांचे 20 वेगळे अभंग आणि त्यासोबत विठ्ठलाचे नवे रूप रेखाटले जाते. (PHOTO : @sheetaltara21/Instagram)
शीतलतारा म्हणते, सुलेखन फक्त कला नसून भक्ती आणि ध्यान आहे. तिच्या मते, 800 वर्षांपासून चालत आलेली पंढरपूरच्या वारीची परंपरा आणि देवनागरी लिपी या दोन्ही गोष्टींकडे जगाचे दुर्लक्ष झाले आहे. या उपक्रमाद्वारे ती महाराष्ट्राची संस्कृती आणि वारकरी संप्रदायाचे महत्त्व जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. (PHOTO : @sheetaltara21/Instagram)
यंदाच्या अक्षरकलावारीत काही नवीन प्रयोग पाहायला मिळणार आहेत. यावर्षी अमूर्त चित्र, उजळ आणि गडद रंगछटांचा संगम आपल्याला रोज पाहायला मिळणार आहे. चौकटीच्या बाहेर जाऊन शीतल विठ्ठलाची रेखाटने करत असते. (PHOTO : @sheetaltara21/Instagram)
यावर्षीच्या अक्षरकलावारीत अनेक नवीन आणि महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या आहेत, जागतिक कीर्तीचे सुलेखनकार अच्युत पालव यांनी यंदाच्या अक्षरकलावारीमध्ये सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या सहभागामुळे या उपक्रमाला आणखी एक उंची प्राप्त झाली आहे. (PHOTO : @sheetaltara21/Instagram)
अमेरिकेतील सॅन होजे येथे पार पडलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या संमेलनाच्या स्मरणिकेत यावर्षी शीतलताराच्या अक्षरकलावारीची विशेष दखल घेण्यात आली. हे या उपक्रमाच्या वाढत्या लोकप्रियतेचे आणि महत्त्वाचे निदर्शक आहे. (PHOTO : @sheetaltara21/Instagram)
शीतलताराच्या या प्रयत्नांमुळे जगभर पसरलेल्या मराठी जनांपर्यंत वारकरी संप्रदायाचा सांस्कृतिक वारसा पोहोचत आहे. अक्षरकलावारीच्या माध्यमातून ती परदेशात राहणाऱ्या मराठी लोकांना त्यांच्या मूळ संस्कृतीशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. (PHOTO : @sheetaltara21/Instagram)
शीतलतारा म्हणते, अक्षरकलावारीच्या माध्यमातून आपण केवळ कला आणि संस्कृती जपत नाही, तर एक समृद्ध विचारधारा आणि जीवनशैली जगभरात पसरवत आहोत. तिच्या या प्रयत्नांमुळे वारकरी संप्रदाय आणि मराठी संस्कृतीला जागतिक स्तरावर नवीन ओळख मिळत आहे. गेल्या वर्षी या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. 17 लाख लोकांनी कलाकृती पाहिल्या आणि आषाढी एकादशीच्या डिजिटल प्रदर्शनाला 10 हजार लोकांनी भेट दिली होती. यावर्षीही अशाच उत्साहाची अपेक्षा आहे. (PHOTO : @sheetaltara21/Instagram)