सावधान! आज विदर्भासह कोकणात धो धो पाऊस बरसणार
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत असल्याचं चित्र दिसत आहे. कारण, कधी ढगाळ वातावरण (Weather) होत आहे, तर कधी जोरदार पाऊस हजेरी लावत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही भागात जोरदार पावसामुळं नदी नावे दुथडी भरुन वाहत आहेत.
ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे, त्या ठिकाणी पेरणीच्या कामांना वेग आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे
अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. त्या भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील कोकणसह संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिनही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भात देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडारा जिल्ह्यात पावसानं पहाटेपासून जोरदार हजेरी लावली आहे. मोहाडीत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावलीय.
जून महिन्यात मुसळधार पडलेल्या पावसाच्या जोरावर नाशिकच्या मनमाड, नांदगाव या भागात पेरण्या उरकण्यात आल्या आहेत. मात्र, त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने आता शेतातील पिके करपू लागली आहेत.
राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.