PHOTO : उजनी जलाशयात नारिंगी पायांचा कलहंस!
उजनी जलाशयात नारिंगी पायाचा कलहंस म्हणजेच. टुंड्रा बीन हंस पक्षी आढळलाय. (Photo Credit : Dr. Vyankatesh Metan)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनोखा पक्षी पाहण्यासाठी पक्षिप्रेमींची गर्दी उजनीमध्ये वाढू लागली आहे. (Photo Credit : Dr. Vyankatesh Metan)
मागील काही दिवसांपासून या पक्ष्यांचा अधिवास धरणाच्या परिसरात आहे. (Photo Credit : Dr. Vyankatesh Metan)
हा पक्षी राजहंस पक्ष्याच्या थव्याबरोबर स्थलांतर करत येथे आला आहे. अशी माहिती पक्षी अभ्यासक डॉ. व्यंकटेश मेतन यांनी दिली. (Photo Credit : Dr. Vyankatesh Metan)
कलहंस हे दोन भिन्न प्रकारचे असतात. एक टायगा आणि दुसरे टुंड्रा बीन हंस. याच्या पाच उपप्रजाती देखील आहेत. ज्यात शरीर, चोचीचा आकार आणि नमुना यांमध्ये फरक आहे. (Photo Credit : Dr. Vyankatesh Metan)
बीन हंस उत्तर युरोप आणि युरोसिबेरियामध्ये प्रजनन करतो. हिवाळ्यामध्ये हे दक्षिणेकडे स्थलांतर करीत युरोप आणि आशियामध्ये येतात. (Photo Credit : Dr. Vyankatesh Metan)
साधारणपणे 68 ते 90 सेंमी या पक्षांची लांबी असते. तर पंख 140 ते 174 सेमीपर्यंत आणि वजन 1.7 ते 4 किलोपर्यंत असतं. (Photo Credit : Dr. Vyankatesh Metan)
गवत, मुळे, कंद, बिया, फळे, फुले, गवत, तृणधान्ये, बटाटे आणि इतर पिके असा या पक्षांचा आहार असतो. यांच्या पंखांचा तपकिरी, राखाडी पांढरा रंग, नारिंगी रंगाचे पाय, काळी नारंगी मध्यम लांबी बदकासारखी मध्यम जाडीची चोच या वैशिष्ट्यावरून हा पक्षी ओळखला जातो. (Photo Credit : Dr. Vyankatesh Metan)
(Photo Credit : Dr. Vyankatesh Metan)
(Photo Credit : Dr. Vyankatesh Metan)