सिद्धू आणि सह्याद्री... केवळ 175 रुपयात 61 दिवसांचा सह्याद्री ट्रेक
सोलापुरातल्या एका तरुणाने अनोखी ट्रेकिंग केलीय. तब्बल 61 दिवस या तरुणांने सोलो ट्रेकिंग करत सात शहर, 28 किल्ले, सह्याद्रीतील ग्राम जीवन या सर्वांचा अनुभव घेतलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिद्धाराम बिराजदार असे या सोलापुरातील तरुणाचे नाव आहे.
राज्याभिषेक सोहळा याची देही याची डोळा अनुभवता यावा यासाठी सिद्धाराम याने सोलापुरातून 31 मी रोजी आपला प्रवास सुरू केला.
गड किल्ले आणि अवघ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा अशी तब्बल 61 दिवसांची भ्रमंती सिद्धाराम यांनी केली. या ट्रेक मध्ये कमीत कमी खर्च करत लिफ्ट मागून त्याने हा प्रवास पूर्ण केला.
प्रवासादरम्यान भेटणाऱ्या लोकांकडून पाहुणचार स्वीकारला. सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर राहणाऱ्या लोकांचं, तिथल्या शेतकऱ्यांचं जीवन बघताना स्वतःला आणि सह्याद्रीला शोधण्याचा प्रयत्न करत होतो. अशी प्रतिक्रिया सिद्धाराम बिराजदार या तरुणाने abp माझाशी बोलताना दिली.
पाश्चात्त राष्ट्रांमध्ये सोलो ट्रेकिंग खूप प्रसिद्ध आहे. मला देखील वाटत होतं की आपलं आयुष्य थांबलय काहीतरी वेगळं करायला हवं.
त्यातून या प्रवासाला सुरुवात झाली. 61 दिवस एकट्याने हा प्रवास केला. त्यात आलेले अनुभव समृद्ध करणारे आहेत. अशा भावना सिद्धराम बिराजदार याने व्यक्त केल्या.
सिद्धू आणि सह्याद्री... केवळ 175 रुपयात 61 दिवसांचा सह्याद्री ट्रेक