PHOTO : स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन, तळकोकणात स्वामींचं वाळूशिल्प

'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्रीस्वामी समर्थ यांचा आज प्रकट दिन आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
संत परंपरेतील एक अलौकिक व्यक्तिमत्त्व असलेले श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट हे त्यांचे मूळ क्षेत्र आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी स्वामी समर्थांचं वाळूशिल्प साकारलं आहे.
वेंगुर्लेतील सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर स्वामी समर्थांचं हे वाळूशिल्प साकारलं असून हे वाळूशिल्प बनवायला दोन तास लागले.
एक टन वाळूपासून हे स्वामी समर्थांचं वाळूशिल्प साकारण्यात आलं आहे.
स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रकट होण्यापूर्वी फिरत फिरत मंगळवेढ्याला आले. तेथे त्यांचे नाव सर्वत्र झाले. तेथून सोलापूर व नंतर अक्कलकोटला आले.
तिथीप्रमाणे चैत्र शुध्द द्वितीया या दिवशी स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन असतो. यंदाच्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये ही तिथी आज म्हणजे 3 एप्रिल रोजी आहे.
स्वामी समर्थ हे श्रीपाद वल्लभ आणि नृसिंहसरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे.