Shiv Jayanti 2022 : अमरावतीत टाकाऊ वस्तूंपासून बनवली भव्य 55 फुटाची तलवार, साकारली शिवसृष्टी
Shiv Jayanti 2022 : अमरावतीत टाकाऊ वस्तूंपासून बनवली भव्य 55 फुटाची तलवार, साकारली शिवसृष्टी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त टाकावू पासून टिकावू या संकल्पनेतून 55 फुट लांब आणि 10 फुट रूंद भव्य अशी तलवार तयार करण्यात आली आहे..
क्विंटल 10 किलोची तलवार रूपी कलाकृती तयार करण्यासाठी...
दिड क्विंटल पुठदा, कागद, कापड, 50 किलो फेविकॉल या विविध वस्तुचा वापर करून तलवारीची प्रतिकृती विद्यार्थ्यांनी 18 दिवसात पुर्ण साकारलेली आहे..
महाराजांचे एक आभुषण म्हणुन तलवारीची मांडणी करण्यात आली. या तलवारीवर शिवकालीन शिवसृष्टी साकारण्यात आली.
स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्यनिर्मितीसाठी शिवरायाच्या मदतीस सतत तत्पर असणा-या आभूषणांची मांडणी तलवारीवर करण्यात आली.
त्यामध्ये राजमाता जिजाऊ यांची चंद्रकोर, शिवपिंड, जिरे टोप, मावळा टोपी, किल्ला ध्वज,
अश्या विविध शिवकालीन आभुषणामुळे या तलवारीला स्वराज्य निर्मीतीचे बळ आले आहे.
या सर्वांचे प्रतिक म्हणून राजमुद्रा या तलवारीवर अंकीत आहे.
अश्या या तलवारीला तयार करण्यासाठी विद्याथ्र्यांसोबत विद्यालयातील शिक्षकांनी परिश्रम घेतले.
या भव्य तलवारीचे नामाकन लिमका बुक ऑफ रेकॉर्ड इंडीया बुक बेस्ट ऑफ इंडीया मध्ये नामांकन दाखल करण्यात आले आहे.