PHOTO : कुणी भव्य रांगोळी काढली तर कुणी तिळावर साकारले शिवराय; कलाकृतीतून महाराजांना मुजरा
कल्याण पूर्वेतील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळातर्फे या वर्षीच्या शिवजयंतीनिमित्त शिवरायांना वंदन करण्यासाठी प्रतिमा साकरण्यात आली आहे, शिवजयंतीनिमित्त सहा हजार रोपांच्या माध्यमातून शिवप्रतीमेची छबी साकारण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील एका हॉलमध्ये जवळपास पाच हजार स्क्वेअर फूट जागेवर रांगोळीच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंती निमित्त आज परभणीतील स्वराज्य आर्टस् च्या कलाकारांनी तब्बल 28 क्विंटल रांगोळी वापरून 72 तास अथक मेहनतीतून 14392 चौरस फुटांची रांगोळीची प्रतिकृती साकारून अनोखे अभिवादन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंती निमित्त आज परभणीतील स्वराज्य आर्टस् च्या कलाकारांनी तब्बल 28 क्विंटल रांगोळी वापरून 72 तास अथक मेहनतीतून 14392 चौरस फुटांची रांगोळीची प्रतिकृती साकारून अनोखे अभिवादन केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड गवाणे येथील चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी तिळाच्या दाण्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र साकारून महाराजांना मानवंदना दिली आहे. शिवजयंती निमित्ताने ही सूक्ष्म कलाकृती त्यांनी साकारली आहे.
हे सूक्ष्म चित्र साकारायला भिंगाचा वापर केला आहे. गेल्यावर्षी एक सेंटीमीटर आकारात छत्रपती शिवाजी यावेळी शिवजयंतीचे निमित्त साधून महाराज यांचे चित्र साकारून मेस्त्री यांनी चक्क तिळावर छत्रपती अभिवादन केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे तिळाच्या दाण्यावर चित्र साकारायला अर्धा तास लागला. त्यासाठी अॅक्रेलिक रंगांचा वापर केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बीडच्या गेवराई शहरामध्ये दगड आणि चून्यातून शिवाजी महाराजांची अतिशय रेखीव चित्ररेखा साकारण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पंडित यांच्या संकल्पनेतून हे रेखाचित्र गेवराई शहरातील आर बी अट्टल महाविद्यालयाच्या प्रांगणात मध्ये साकारण्यात आला आहे. यासाठी चार दिवस या कलाकाराने मेहनत घेऊन हे चित्र रेखाटले आहे..