PHOTO : कोविड संकटानंतर पहिल्यांदाच शिर्डीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत साई परिक्रमा
शिर्डी साई परिक्रमेस भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून देश विदेशातील हजारो भाविक या पायी परिक्रमेत सहभागी झाले
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App14 किलोमीटर असलेली ही परिक्रमा लक्षवेधी ठरली.
शालेय विद्यार्थ्यांनी साकारलेले चित्ररथावरील देखावे, ढोल - ताशांचा गजर अशा थाटात खंडोबा मंदिरापासून सकाळी 6 वाजता परिक्रमेस सुरूवात झाली.
साईबाबा हयातीत असताना शिर्डी गावच्या शिवेची परिक्रमा करत होते, असा उल्लेख साईबाबांच्या जीवनावर आधारीत साईसतचरित्र ग्रंथात आढळतो.
त्या धर्तीवर तीन वर्षापूर्वी ग्रीन अँड क्लिन शिर्डीच्या वतीने साई परिक्रमा उत्सव सुरू करण्यात आला.
मात्र कोविड संकटात या उत्सवात खंड पडला होता. सर्व नियम शिथील झाल्यानंतर आज निघालेल्या शिर्डी परिक्रमेत पाच हजारांहून अधिक भाविक सामिल झाले आहेत.
ग्रामस्थच नव्हे तर शालेय विद्यार्थी, शिक्षक तसेच राज्य आणि विदेशातून आलेले भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे.
साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे, विश्वस्त मंडळाचे सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांचे हस्ते साईबाबांची आरती पार पडल्यानंतर या परिक्रमेची सुरूवात झाली. ज्या मार्गावरून परिक्रमा जाणार त्या मार्गावर रांगोळी तसेच फुलांचे आच्छादन करण्यात आले.
विविध वेषभूषा परिधान करत भाविक मोठ्या उत्साहाने या उत्सवात सहभागी झाले