PHOTO : 'ब्रेक द बायस'... स्त्री-पुरुष समानतेसाठी नागपुरात मॅरेथॉन; हजारो महिला धावल्या
कस्तुरचंद पार्क मैदानातून सुरू झालेल्या पाच किलोमीटर, तीन किलोमीटर आणि दोन किलोमीटर अंतराच्या शर्यतीत हजारो महिला सहभागी झाल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता वर्मा लवंगारे आणि नागपूरचे जिल्हाधिकारी आर विमला यांनी या मॅराथॉनसाठी विशेष प्रयत्न घेतले. या मॅरेथॉनचे माध्यमातून अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदाच क्रीडा प्रकारात सहभागी होण्याची संधी मिळाली असे मत काही महिलांनी व्यक्त केले.
तर काहींनी थेट शालेय जीवनानंतर पहिल्यांदाच शर्यतीत धावण्याचा मनमुराद आनंद लुटल्याची भावना व्यक्त केली.
तर काहींनी थेट शालेय जीवनानंतर पहिल्यांदाच शर्यतीत धावण्याचा मनमुराद आनंद लुटल्याची भावना व्यक्त केली.
तर कोरोनाच्या दोन वर्षांच्या बंधनानंतर अशा आयोजनाच्या माध्यमातून घराबाहेर पडण्याची आणि मैत्रिणींना भेटण्याची संधीही या मॅराथॉनने उपलब्ध करून दिल्याची भावना काही महिलांनी व्यक्त केली.
समाजात व्याप्त स्त्री पुरुष भेदभाव त्यागून दोघांना समसमान संधी उपलब्ध व्हावी, महिला सुरक्षेला महत्त्व मिळावं, शासनाच्या महिलांसाठीच्या विविध योजनांची माहिती महिलांना व्हावी अशा विविध उद्देशाने ही महिला मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेले हे उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे.