'आभार! साहेब पुन्हा मैदानात'; पवारांकडून निर्णय मागे, कार्यकर्त्यांनी बॅनर्स झळकावून मानले आभार!
शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आणि संपूर्ण राज्यभरात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाल (5 मे) रोजी समितीनं शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला. त्यानंतर शरद पवारांनी आपला निर्णय मागे घेतला.
कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स झळकावून शरद पवारांचे आभार मानले आहेत.
'आभार! साहेब पुन्हा मैदानात', अशा आशयाचे बॅनर्स ठाण्यात, नवी मुंबईत लावण्यात आले आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच महाविकास आघाडीचे प्रमुख नेत्यांचे फोटोही या बॅनर्सवर लावण्यात आले आहेत.
आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड तसेच ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी शरद पवारांचे आभार मानणारे बॅनर्स लावलेत.
'साहेब पुन्हा मैदानात', असे बॅनर्स संपूर्ण ठाणे शहरात लावण्यात आले आहेत.
जुन्या मुंबई पुणे बेलापूर मार्गावरील कळवा नाक्यावर तर ठाण्यातील बऱ्याच ठिकाणी हे भले मोठे बॅनर्स लावण्यात आले आहेत.
2 मे रोजी 'लोक माझे सांगाती' पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केलेली.
शरद पवारांच्या घोषणेनंतर संभागृहात एकच गदारोळ झाला आणि शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून होऊ लागली.
शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या सदस्य समितीकडे हा निर्णय सोपावला आणि समितीचा निर्णय मला मान्य असेल, असं सांगितलं होतं. अखेर शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घेत असल्याचं जाहीर केलं.