Shakambhari Purnima 2023: शाकंबरी पौणिमेनिमित्त अकलाई देवीला 65 भाज्यांचा महाभोग, दर्शनसाठी भाविकांची गर्दी
आज शाकंबरी पौर्णिमा (Shakambhari Purnima) आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाळशिरस तालुक्यातील अकलूज गावचे ग्रामदैवत आई अकलाई देवीच्या मंदिरामध्ये आज शाकंभरी पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी देवीची शाकंभरी देवी रुपात अलंकार महापूजा करण्यात आली
पूजेनंतर देवीला 65 भाज्यांचा नैवेद्यही दाखवण्यात आला
मंदिराचे मार्गदर्शक जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुरव परिवाराच्या वतीने विविध धार्मिक विधी या ठिकाणी संपन्न होत आहेत.
पौर्णिमेला दर्शनासाठी महिला भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
शाकंबरी ही तशी सर्वसामान्य शेतकऱ्याची देवी मानली जाते. आपल्या शरीरावर सर्व प्रकारची शाक अर्थात भाज्या पाने , फुले , फळे धारण केलेली देवी असे तिचे वर्णन केले जाते. या देवीची पौर्णिमाही याच पद्धतीने खास असते.
या हंगामात पिकणाऱ्या किमान 60 प्रकारच्या भाज्याचा भोग देवीला दाखवण्याची परंपरा आहे.
सूर्योदयापूर्वी म्हणजे पहाटे साडेपाच वाजता हा महानैवेद्य अर्थात 86 प्रकारच्या पदार्थांचा भोग देवीला दाखवावा लागतो.
ब्राह्मण , कोष्टी , लिंगायत , सोनार अशा अनेक समाजामध्ये हे देवीचे नवरात्र उत्सव साजरा होतो.