Satara : सलाम! प्रशासनाची वाट न बघता साताऱ्यातील आजोबांनी दरड हटवून रस्ता मोकळा केला
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये जोरदार पाऊस कोसळला (Satara News) आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे काही ठिकाणी दरडी कोसळू लागल्या आहेत.
कास शेजारील भांबवली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही दिवसापूर्वी दरड कोसळली होती.
यामुळे भांबवली गाव आणि वजराई धबधब्याकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता.
दरड कोसळली असल्याने या रस्त्यावरून ये जा करताना ग्रामस्थ आणि पर्यटकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत होतं.
ग्रामस्थ आणि पर्यटकांची ही अडचण लक्षात घेऊन दोन वयोवृद्ध नागरिकांनी प्रशासकीय यंत्रणेची वाट न पाहता ही दरड हटवून रस्ता मोकळा केला आहे.
65 वर्षाचे चंद्रकांत मोरे आणि 50 वर्षाचे बळीराम सपकाळ यांनी स्वतः हातात कुदळ आणि फावडे घेऊन भर पावसात मेहनत घेऊन ही दरड बाजूला केली.
या दोन्ही आजोबांनी केलेल्या या कामाबद्दल सर्व स्तरातून कौतुक केलं जातं आहे.
या दोन्ही आजोबांची प्रेरणा घेऊन शासकीय यंत्रणेने देखील अशाच प्रकारचे तत्परतेने काम करण्याची गरज असल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे.
image 10