PHOTO : रोहित पवार तीर्थयात्रेला; परिवारासह देवदर्शनाचे फोटो केले शेअर
राज्यातील नेत्यांच्या देवस्थानांच्या भेटी वाढताना दिसत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनसे प्रमुख राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा ठरला आहे. 5 जून रोजी ते अयोध्येला जाणार आहेत.
तर मंत्री आदित्य ठाकरे हे देखील अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचं कळतंय.
अशात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार अचानक सहकुटुंब देवदर्शनाला पोहोचले आहेत.
राजस्थानची यात्रा केल्यानंतर आता ते उत्तर प्रदेशात पोहोचले आहेत.
आमदार रोहित पवारांसोबत त्यांचे आईवडील देखील आहेत.
विशेष म्हणजे आपल्या या देवदर्शनाचे प्रत्येक अपडेट ते आपल्या फेसबुकवरुन देत आहेत.
रोहित पवार यांनी गेल्या तीन दिवसांपासून सहकुटुंब ही तीर्थयात्रा सुरु केली आहे.
पंढरपुरातून विठ्ठलाचे दर्शन घेत या यात्रेला त्यांनी सुरुवात केली.
रोहित पवारांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्राला भक्तीची, अध्यात्माची उच्च परंपरा आहे. अनेकदा अचानक अडचणीचा प्रसंग येतो आणि आपण त्यातून सहीसलामत मार्ग काढतो, यामागेही भक्ती आणि अध्यात्माची एक अदृश्य शक्तीच असते, असं माझं मत आहे.
रोहित पवारांनी म्हटलं आहे की, अध्यात्मावर, ईश्वरावर माझी श्रद्धा आणि भक्ती आहे. विज्ञानाने केवळ भौतिक प्रगती होते, पण विज्ञानाला अध्यात्माची जोड मिळाली तर माणूस सुखी-समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच आजच्या प्रगत विज्ञान युगातही मनःशांतीसाठी अध्यात्माचा मार्ग निवडला जातो.