Ramesh Bais : रमेश बैस यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ
image 1महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांनी आज राज्यपालपदाची (Governor) शपथ घेतली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधीचा सोहळा पार पडला. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला (Sanjay V. Gangapurwala) यांनी बैस यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
रमेश बैस यांनी महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल म्हणून आज पदभार स्वीकारला. रमेश बैस यांनी मराठीतून राज्यपालपदाची शपथ घेतली.
महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेला आणि कल्याणाला मी वाहून घेईन, अशी प्रतिज्ञा रमेश बैस यांनी घेतली.
भगतिसंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर रमेश बैस यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती.
रमेश बैस यांची जुलै 2021 मध्ये झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले होते. याआधी जुलै 2019 ते 2021 पर्यंत त्रिपुराचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले.
2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आले होते तेव्हा त्यांना त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मध्य प्रदेश भाजपचे ते उपाध्यक्ष होते.
रमेश बैस यांनी नगरपालिकेतून आपल्या राजकीय करिअरला सुरुवात केली होती. 1978 मध्ये ते सर्वप्रथम नगरपालिकेत निवडून आले होते. त्यानंतर 1980 ते 84 मध्ये मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य होते.
1989 मध्ये रायपूर येथील लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. ते रायपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सात वेळा खासदार राहिले आहेत.