Raj Thackeray on Toll : राज ठाकरेंकडून टोलसंदर्भातील 10 मोठ्या घोषणा
टोल किती वसूल झाले याची माहिती दोन्ही बाजूने दिली जाणार.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिवसभरात किती जमा झाली याची माहिती सुद्धा मिळणार.
आनंद नगर ते ऐरोली यादरम्यानचा टोल एकदाच भरावा लागणार तो दोनदा भरण्याची आवश्यकता नाही.
जुने टोल बंद करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार.
पुढील15 दिवस या सर्व एन्ट्री पॉईंट्सवर सरकार आणि आमच्या पक्षाचे कॅमेरे लावले जातील. किती गाड्या या टोल वरून जातात हे कळेल.
रुग्णवाहिका, स्वच्छतागृह , सीसीटीव्ही कंट्रोल मंत्रालयात असेल तिथे लोकांना काय त्रास होताय ते कळेल.
5 रुपये वाढीव टोल बाबत 1 महिन्याचा अवधी सरकारला हवा, त्यानंतर रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल.
टोलनाक्यांवर स्वच्छतागृहांची सोय असावी.
रस्ते खराब असल्यास टोल भरला जाणार नाही.
टोलनाक्यांजवळ राहणाऱ्यांसाठी पास मिळावा.
पिवळ्या रेषेमागे चार मिनिट वाहन थांबल्यास टोल भरला जाणार नाही .
वांद्रे सीलिंक, एक्स्प्रेस वे टोलची कॅगकडून चौकशी.
वाढीव टोल रद्द करण्यासाठी 1 महिन्यांची मुदत.
मुंबई एन्ट्री पाँईंटवर मनसे स्वच्छतागृह उभारले जाणार.