महाराष्ट्रात 'या' तारखेला मान्सूनचं आगमन होणार, पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज
हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी देशात कधी मान्सूनचं आगमन होणार? महाराष्ट्रात कधी पाऊस पडणार? याबाबतची माहिती दिलीय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्यावर्षी उन्हाळ्यात जास्त पाऊस पडतो त्या पावसाळ्यात नेहमीच कमी पाऊस पाहायला मिळतो. गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती.
उन्हाळ्यात फारसा पाऊस झालेला नाही, परिणामी पावसाळ्यात समाधानकारक असा पाऊस होणार असा अंदाज डख यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.
पंजाबराव डख यांनी यंदा 22 मे ला मान्सूनचे अंदमानत आगमन होणार असल्याची माहिती दिली आहे. तर महाराष्ट्रात 12 ते 13 जूनच्या आसपास मोसमी पावसाला सुरुवात होणार असल्याचं पंजाबराव डख यांनी म्हटलं आहे.
राज्यात पेरणीयोग्य पावसाला 22 जूननंतर सुरुवात होईल अशी माहिती देखील डखांनी दिली आहे.
22 मे ला मान्सूनचे अंदमानत आगमन होणार आहे. तर महाराष्ट्रात 12 ते 13 जूनच्या आसपास पाऊस होणार आहे.
पंजाबराव डख यांनी यंदा 22 मे ला मान्सूनचे अंदमानत आगमन होणार असल्याची माहिती दिली आहे.
25 ते 27 जून दरम्यान महाराष्ट्रात पेरणीयोग्य पाऊस होईल अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. तर जुनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण होतील असा विश्वास पंजाबराव डखांनी व्यक्त केला आहे.
यंदा जुलै महिन्यात जास्तीचा पाऊस, ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस होणार असे भाकीत त्यांनी व्यक्त केले आहे.
राज्यात पूर्व मौसमी पावसाला पोषक परिस्थिती तयार होत आहे. पंजाबराव डखांनी म्हटल्याप्रमाणे आजपासून अर्थातच 7 मे पासून ते 11 मे 2024 पर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पूर्व मौसमी पाऊस पाहायला मिळू शकतो.