Maharashtra Bhushan: भाई, लता दीदी, आशाताई अन् आता आप्पासाहेब; महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या मान्यवरांची यादी
लेखक, चित्रपट निर्माते, नाटककार, अभिनेते, संगीतकार पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (Purushottam Laxman Deshpande) यांना 1996 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारनं सन्मानित करण्यात आलं. पुलं देशपांडे यांची पुस्तक आजही लोक आवडीनं वाचतात. पुलं देशपांडे यांनी त्यांच्या लिखाणानं वाचकांच्या मानात विशेष ओळख निर्माण केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना 1997 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. लता मंगेशकर यांचं संगीतक्षेत्रात मोठं योगदान आहे.
शास्त्रज्ञ विजय भटकर (Vijay Bhatkar) यांना 1999 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. महाराष्ट्र भूषण पुरस्कारासोबतच त्यांना पद्म भूषण आणि पद्मश्री यांसारख्या प्रतिष्ठीत पुरस्कारांने देखील सन्मानित करण्यात आलं आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) 2001 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. सचिननं क्रिकेट विश्वात विशेष ओळख निर्माण केली आहे.
प्रसिद्ध गायक भीमसेन जोशी (Bhimsen Joshi) यांनी आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं. भीमसेन जोशी यांना 2002 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अभय आणि राणी बंग (Abhay and Rani Bang) यांना 2003 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आलं.
समाजसेवक बाबा आमटे (Baba Amte) यांना 2004 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन नावाचा आश्रम त्यांनी सुरू केला.
शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ रघुनाथ अनंत माशेलकर (Raghunath Anant Mashelkar) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2005 मध्ये प्रदान करण्यात आला.
भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांना 2006 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. रतन टाटा यांना पद्म विभूषण आणि पद्म भूषण सारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
आ. रे पाटील यांना 2007 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. (R. K. Patil)
2009 मध्ये हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील श्रेष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं सन्मानित आलं. सुलोचना लाटकर यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं.
2008 मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे ज्येष्ठ निरुपणकार दिवंगत नानासाहेब धर्माधिकारी (Nana Dharmadhikari) यांना मरणोत्तर 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं. ज्येष्ठ निरुपणकार दिवंगत नानासाहेब धर्माधिकारी यांचे सुपुत्र पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला होता.
कवी मंगेश पाडगावकर (Mangesh Padgaonkar) यांना 2008 मध्ये 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं सन्मानित आलं. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलं.
2010 मध्ये शास्त्रज्ञ आणि लेखक जयंत नारळीकर यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं सन्मानित आलं. अंतराळातील भस्मासुर, चला जाऊ अवकाश सफरीला यांसारख्या पुरस्तकांचे लेखन जयंत नारळीकर यांनी केलं. तसेच त्यांनी विज्ञान क्षेत्रात देखील मोठं योगदान दिलं आहे.
डॉ. अनिल काकोडकर यांचं विज्ञान क्षेत्रात मोठं योगदान आहे. त्यांना 2011 मध्ये 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना 2015 मध्ये 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं सन्मानित आलं. त्यांनी 'जाणता राजा' या ऐतिहासिक गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन केले. त्यांचे 'मुजऱ्याचे मानकरी', 'राजा शिवछत्रपती', 'महाराज', 'शेलारखिंड', 'पुरंदऱ्यांचा सरकारवाडा', 'शनवारवाड्यातील शमादान', 'शिलंगणाचं सोनं', 'पुरंदरच्या बुरुजावरून', 'कलावंतिणीचा सज्जा', 'महाराजांची राजचिन्हे', 'पुरंदऱ्यांची नौबत' आदी साहित्य प्रकाशित झाले.
प्रसिद्धा गयिका आशा भोसले (Asha Bhosle) यांना 2021 मध्ये 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारा देऊन गौरवण्यात आलं. आशा भोसले यांनी अनेक हिट चित्रपटांमधील गाणी गायली आहेत.
आता ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराची घोषणा करण्यात आली.