In Pics : कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या वस्तू लवकरच ‘ई-मार्केटप्लेस’वर
मकर संक्रांती सणानिमित्त कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे उद्घाटन उद्योग विक्री केंद्र येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे अपर पोलीस महासंचालक व राज्याचे कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकारागृह उत्पादित वस्तू ई-मार्केटप्लेस वर लवकरच नागरिकांसाठी खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील, असे गुप्ता यावेळी म्हणाले.
यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक पश्चिम विभाग स्वाती साठे,कारागृह उपमहानिरीक्षक मुख्यालय सुनील ढमाळ ,येरवडा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक शिवशंकर पाटील व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एम.डी. कश्यप इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
टेबल, खूर्ची, कपाटे, गणवेश, सतरंजी, साड्या, फाईल्स ईत्यादी विक्रीसाठी उपलब्ध आहे.
कारागृह उत्पादित वस्तूंची मोठ्या व्यापक प्रमाणात प्रसिद्धी होणे आवश्यक आहे तसेच कारागृह उत्पादित वस्तू ई-मार्केटप्लेस वर लवकरच नागरिकांसाठी खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील
कारागृहात अनेक सुधारणा करणे गरजेचे आहे.
अनेक पुणेकरांना या मेळाव्याला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
यात लाकडी खुर्चांचादेखील समावेश आहे.