Pune Accident Photo : एक नाही, दोन नाही तब्बल 48 गाड्या एकमेकांवर आदळल्या, पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघाताचा थरार
Pune Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुलावर (Navale Bridge) अपघात सत्र सुरूच आहे. आज रात्रीच्या सुमारास नवले पुलावर भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया अपघातामध्ये 48 गाड्यांचे नुकसान झाले असल्याची माहिती पीएमआरडीए अग्निशमन दलाने दिली आहे. अग्निशमन दलाच्या 2 रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरू आहे. अद्याप या अपघाताबाबत अधिकची माहिती प्राप्त होऊ शकलेली नाही.
या अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील (Sinhagad Road Police Station) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांकडून घटनास्थळी धाव घेत काही नागरिकांच्या मदतीनं अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरु करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार नवले ब्रिजवर नर्हे नजीकच्या परिसरात हा भीषण अपघात झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लागलीच सिंहगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
कंटेनरने धडक दिल्यामुळे या सर्व गाड्या एकमेकांवर आदळल्या असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात एकूण 48 गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. दरम्यान या अपघातात अद्याप तरी कुठलीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती आहे.
नवले पुलावर नेहमीच वाहनांची गर्दी असते. त्यामुळे वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होते. नवले ब्रिजची ओळख सध्या अपघाती ब्रिज होतोना दिसत आहे.
या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अपघातांचे सत्र सुरूच आहे. आजपर्यंत शेकडो लोकांना या अपघातांमध्ये आपला प्राण गमवावा लागला आहे.
सतत होणाऱ्या या अपघातांकडे महामार्ग प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करण्यात आली आहेत.
नागरिकांकडून यासाठी आंदोलने देखील करण्यात आली आहेत. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाल्याचे दिसत नसून अपघातांचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.