PHOTO : आज प्रक्षाळ पूजेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजलं, आकर्षक फुलांची सजावट, पाहा मनमोहक रुप

आज प्रक्षाळ पूजेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजलं आहे. मिताली सुर्वे यांनी विठुरायाचं रुप रांगोळीतून साकारलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
श्रीरंग कलादर्पणच्या वतीनं देखील अशा प्रकारची सुंदर रांगोळी काढण्यात आली आहे.

आज प्रक्षाळ पूजेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला सजावट करण्यात आली आहे.
आषाढी वारी काळात देव भक्तांना दर्शन देण्यास 24 तास उभा असतो अशी भावना आहे.
17 दिवस उभा असलेल्या देवाची आज प्रक्षाळ पूजा आहे.
त्यानिमित्ताने संपूर्ण मंदिरात फुलांची आरास केली आहे.
झेंडू, शेवंती, गुलछडी, ऍनथोरीयम, ऑरकेड, गुलाब, ब्लू, कामिनी, फुलांची रंगसंगती वापरून आरास करण्यात आली.
यासाठी 2 टन फुले वापरली आहेत. पुण्यातील भाविक अमोल शेरे आणि अभिजित मोहिते यांनी ही सजावट केली आहे.
कोरोनामुळं यंदाही आषाढीची वारी वारकऱ्यांविनाच पार पडली. मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत वारी पार पडली.