PHOTO : सिंधुदुर्ग समुद्र किनारपट्टीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी, टेहळणी पथकं तयार करण्याचे आदेश

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन दिवसांपूर्वी तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर बोट बुडून दोघांचा मृत्यू झाला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
त्यानंतर जिल्हा प्रशासनाला जाग आल्याचं दिसून येतंय.

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
यावेळी त्यांनी पर्यटकांच्या सुरक्षेच्या संदर्भात पाऊलं उचलण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
जिल्ह्यात ज्या समुद्र किनाऱ्यांवर वॉटर स्पोर्ट्स होत आहेत, त्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सर्व यंत्रणांनी सतर्क आणि सक्रिय रहावे.
कोणत्याही प्रकारच्या दुर्घटना होणार नाही यासाठी तहसिलदार, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी, पोलीस यंत्रणा आणि बंदर विभाग यांनी टेहळणी पथक स्थापन करावं.
समुद्र किनाऱ्यावरील अनधिकृत बाबींवर तात्काळ कारवाई करावी, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिल्या.
त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग पोलिसांनी आज किनारपट्टीवर पहाणी केली.
जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत आणि भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सर्व प्रमुख यंत्रणांची आज बैठक घेण्यात आली.