Photos: भारतीय राजे प्रत्यक्षात कसे दिसायचे? चित्रकार माधव कोहलींनी साकारली हुबेहुब चित्रे
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने छायाचित्रे बनवणे हा सध्या ट्रेंडमध्ये आहे. कलाकाल माधव कोहली यांनी देखील भारतीय इतिहासातील प्रसिद्ध राज्यकर्त्यांचे चित्रे साकारली आहेत. माधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे अतिशय सुंदर छायाचित्र साकारले आहे. मुघलांच्या सत्तेला मराठ्यांनी सर्वात मोठे आव्हान दिले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. शेवटपर्यंत मुघलांना महाराष्ट्रात पाय रोवता आला नाही. राज्य कसे करावे याचे उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज यांनी घालून दिले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाधव यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर ही छायाचित्रे पोस्ट केली आहेत. माधव यांनी मौर्य वंशाची स्थापना करणाऱ्या चंद्रगुप्त मौर्याचे अतिशय सुरेख चित्र साकारले आहे.
भारतातील मुघल वास्तुकलेचा उत्तम प्रकार शाहजहानच्या कारकिर्दीत समोर आला. ताजमहाल आणि दिल्लीचा लाल किल्ला त्यांनीच बांधला होता. माधव यांनी शाहजहान याचेही छायाचित्र साकारले आहे.
माधव यांनी मुघल सम्राट अकबर याचे देखील छायाचित्र साकारले आहे. अकबराने आपल्या कारकिर्दीत मुघल सत्ता बळकट केली. त्यानंतर ही सत्ता जवळपास 300 वर्षे टिकली.
सरदार हरिसिंह नलवा हे महाराजा रणजित सिंह यांचे सेनापती होते. त्यांच्या लष्करी रणनीतीचे उदाहरण दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शीख साम्राज्याने आपल्या सीमा पेशावरपर्यंत वाढवल्या होत्या.
पंजाबचे राज्यकर्ते महाराणा रणजित सिंग यांच्या सैन्याचे उदाहरण जगभर दिले जाते. त्यांनी मुघलांपासून लाहोर हिसकावून घेतले आणि त्याला पंजाबची राजधानी केली.
1208 ते 1526 पर्यंत दिल्लीवर पाच सुलतानांचे राज्य होते. त्यांच्यामध्ये तुघलक राजवंशही होता. मुहम्मद तुघलक हा या घराण्याचा राज्यकर्ता होता. राजधानी दिल्लीहून दौलताबादला हलवणे हे त्याचे मुख्य काम होते. परंतु, यामध्ये तो अयशस्वी ठरला.
बहादूर शाह जफर हा मुघल घराण्याचा शेवटचा राज्यकर्ता होता. 1857 चा भारतीय स्वातंत्र्यलढा त्याच्या नेतृत्वाखाली लढला गेला. इंग्रजांनी त्याला अटक करून रंगूनला पाठवले, तिथेच त्याचा मृत्यू झाला.
हे चित्र झहीरुद्दीन मोहम्मद बाबर याचे आहे. बाबर याने भारतात मुघल राजवटीचा पाया घातला. 1526 मध्ये पानिपतच्या युद्धात दिल्लीच्या सुलतान इब्राहिम लोदीचा पराभव करून बाबरने सत्ता काबीज केली.
माधव यांनी पृथ्वीराज चौहान यांचे देखील छायाचित्र साकारले आहे.
दिल्लीच्या तख्तावर विराजमान झालेल्या खिलजी घराण्यातील राजा अलाउद्दीन खिलजीचे हे चित्रही माधव यांनी साकारले आहे. खिलजीची गणना क्रूर राज्यकर्त्यांमध्ये होते. काका जलालुद्दीन खिलजीला मारून अलाउद्दीन गादीवर बसला होता.
बाबरनंतर 1530 मध्ये त्याचा मुलगा हुमायून गादीवर बसला. 1939 मध्ये चौसाच्या लढाईत शेरशाह सूरीकडून पराभूत झाल्यानंतर त्याला पळून जावे लागले. 1555 मध्ये त्याने पुन्हा सत्ता हस्तगत केली.
हे चित्र मौर्य वंशाची स्थापना करणाऱ्या चंद्रगुप्त मौर्याचे आहे.
हे चित्र मौर्य साम्राज्याचा शासक बिंदुसारा याचे देखील चित्र माधव यांनी साकारले आहे. बिंदुसार हा चंद्रगुप्त मौर्याचा मुलगा आणि सम्राट अशोक यांचे वडीत होते.