PHOTO : कोरोनाचा संपूर्ण कालखंड रांगोळीतून साकारला, वसईत अनोखं रांगोळी प्रदर्शन
वसई : कोरोना काळावधीत मागील दोन वर्षांपासून अनुभवलेल्या कटू गोड आठवणी वसईतील रांगोळी कलाकारांनी त्या आपल्या रांगोळीतून जिवंत केल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवसईच्या न्यू इंग्लिश स्कूल, वसई या शाळेत एक अनोख रांगोळी प्रदर्शन भरलं आहे. हे प्रदर्शन 8 नोव्हेंबर पर्यंत नागरिकांसाठी खुलं असणार आहे. कोरोनाचा संपूर्ण कालखंड रांगोळीतून साकारला आहे
. 26 फुट लांब आणि 4 फुट रुंद अशी या विविध छटा या रांगोळीतून उमटल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसह अन्य काही महापुरुषांच्या रांगोळ्या देखील साकारल्या आहेत.
वसईतील कलाकारांना वसईची ओळख व्हावी. तसेच वसईतील कलाकार हे नागरिकांना कळावेत यासाठी हे आगळंवेगळं रांगोळी प्रदर्शन भरवलं असल्याच आयोजकांनी सांगितलं आहे.
हे रांगोळी काढणारे सर्व कलाकार हे वसई, जूचंद्र आणि आजूबाजूच्या परिसरातील आहेत. या कलाकारांनी देशविदेशात रांगोळी मध्ये आपलं नाव कमावलं आहे.
कोरोना काळातील महामारीचा जीवघेणा काळ, दारात आलेली रुग्णवाहिका, कोरोनामुळं मृत झालेले व्यक्ती, मृत व्यक्तीची जळणारी चिता, त्यानंतर त्यांच्या घरावर ओढलेले दुःख हे हुबेहूब रांगोळीतून वसईतील रांगोळी कलाकारांनी साकारलं आहे.
एवढेच नाही तर पाण्यावरची रांगोळी, पाण्याखालाची रांगोळी, मोझाक रांगोळी, रांगोळी काढतानाची रांगोळी, टू डायमेंशन (2 D) रांगोळी, थ्री डायमेंशन (3 D) रांगोळी, डेथ रांगोळी, व्यक्तिचित्र रांगोळी, वसईतील प्रसिद्ध पापलेट रांगोळी आशा विविध प्रकारच्या रांगोळ्या या प्रदर्शनात नागरिकांचे आकर्षण ठरत आहेत.
आपल्याला या कलाकारांच्या रांगोळीची कला ही न्यु इंग्लिश स्कुल, वसई येथे विनामुल्य पाहता येणार आहे. रांगोळी प्रदर्शन बघण्याची वेळ सकाळी ९ ते १२ तर सायंकाळी ४ ते ७.३० असणार आहे.
त्यामुळे नागरीकांनी या आगळ्या वेगळ्या रांगोळीचा मनमुराद आनंद घ्यावा असं आवहान शाळेतर्फे करण्यात आलं आहे.
सर्व फोटो हनीफ पटेल यांनी काढले आहेत.