Bharat Jodo: भारत जोडो यात्रेत नेत्यांचे वारसदार... नेत्यांच्या मुला-मुलींसह नातेवाईकांचाही सहभाग, पाहा फोटो
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. ते म्हणजे काँग्रेसच नाही तर राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर त्यांचे भाऊ मुलं, भाचे, पुतणे असे भावी राजकीय वारसदार या यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंविधानिक मूल्ये आणि सद्भावनेसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा मोठ्या उत्साहात आणि प्रचंड गर्दीत देगलूर मधुन महाराष्ट्रात दाखल झाली. देगलूरला अशोक चव्हाण, नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधींचे स्वागत केले आणि तेथेच कॉर्नर सभा पार पडली.
दुसऱ्या दिवशी सकाळीच जेव्हा यात्रा वण्णाळी येथील गुरुद्वारा परिसरात पुढे निघाली यावेळी या यात्रेत त्यांच्या समवेत अशोक चव्हाण यांच्या सुजया आणि श्रीजया या दोन्ही कन्या सहभागी झाल्या. त्यांच्यासोबत कर्नाटकातील खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यादेखील सहभागी होत्या. त्यांचा हा सहभाग दुसऱ्या दिवशीही पाहायला मिळाला.
पाचव्या दिवशी जेव्हा राहुल गांधी यांची ही भारत जोडो यात्रा चोरंबा फाटा या ठिकाणाहून हिंगोलीकडे मार्गक्रमण करत होती. त्यावेळी त्यांच्या समवेत युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे सहभागी झाले.
अमित देशमुख आणि त्यांचे बंधू धीरज देशमुख, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे हे देखील या यात्रेत दिसून आले.
चौथ्या दिवशी जेव्हा ही यात्रा नांदेड शहरात पोहोचली इथे राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे या यात्रेत सहभागी झाले.
राष्ट्रवादीचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची कन्या पूर्वा, जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड याही सहभागी झाल्या. या सर्वांनी अख्ख्या नांदेड शहरातील पूर्ण पदयात्रेत आपला उस्फुर्त सहभाग नोंदवला.
तिसऱ्या दिवशी जेव्हा ही यात्रा शंकर नगरहून पुढे मार्गक्रमण करत होती यावेळी माजी मंत्री सतेज पाटील त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे ही राहुल गांधी यांच्या सोबत या पदयात्रेत चालत होते.
काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव, बाबा सिद्दिकी यांचे चिरंजीव झिशान सिद्दिकी हे ही राहुल गांधी यांच्या समवेत दिसून आले.
राहुल गांधी यांच्यासोबत या यात्रेत माजी मंत्री नितीन राऊत यांचे चिरंजीव युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत ही सहभागी झाले होते.