PHOTO : मुंबईसह राज्यभरात सूर्यग्रहण पाहण्याची उत्सुकता, विविध ठिकाणी खास सोय
नाशिकमध्ये 4 वाजून 47 मिनिटांनी सूर्यग्रहण दिसण्यासा सूरूवात झाली. नागरिकांमध्ये ग्रहण पाण्यासाची उत्सुकता होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशभरातील मंदिरात आज ग्रहणाच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रथा असून शिर्डीच्या साईमंदिरात ग्रहण सुरू होताच मुख्य दर्शन रांग बंद करण्यात आली. मुख्य गाभाऱ्यात मंत्रोचार करण्यात आला. समाधी मंदिरात साईबाबांच्या समाधीवर तुळशीपत्र ठेऊन मंत्रोचाराला प्रारंभ झाला. आरती झाल्यानंतर मुख्य दर्शन रांग सुरू झाली.
पुण्यात 4 वाजून 51 मिनिटांनी सूर्यग्रण दिसले.
वाशिम जिल्ह्यात खंडग्रास सूर्यग्रहण 5 वाजून 9 मी पासून दिसण्यास सुरूवात झाली.
मुंबईत मरीन ड्राईव्ह येथे सूर्यग्रहण पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. तर ठाण्याच्या कोलशेत खाडी येथे नागरिकांसाठी विशेष सूर्यग्रहण बघण्याचे आयोजन करण्यात आले होते. 4 वाजून 49 मिनिटांनी मुंबईत सूर्यग्रण दिसले.
नागपूरच्या रमण सायन्स विज्ञान केंद्रामध्ये नागरिकांसाठी हे ग्रहण बघण्याची विशेष सोय करण्यात आली. टेलिस्कोपच्या माध्यमातून नागपूरकरांनी हे ग्रहण पाहिले.
ठाण्याच्या कोलशेत खाडी येथे नागरिकांसाठी विशेष सूर्यग्रहण बघण्याचे आयोजन करण्यात आले होते.
Amature astronomy club यांच्यातर्फे सूर्यग्रहण पाहण्यासाठी लोकांना सोलार गॉगल देखील देण्यात आले होते.
नागपूरमध्ये ग्रहण बघण्यासाठी विशेष गॉगलसची पण व्यवस्था येथे करण्यात आली होती.