In Pics | माघ शुद्ध पौर्णिमेनिमित्त द्राक्षांनी सजवली विठुरायाची राऊळी
आज माघ शुद्ध पौर्णिमेनिमित्त पंढरपूर तालुक्यातील एका शेतकरी भक्ताने विठ्ठल मंदिरास शेतातील द्राक्षांची सुंदर आरस केली
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपौर्णिमेला माघ यात्रेची सांगता होत असताना या शेतकरी भक्ताने आपल्या शेतातील एक हजार किलो द्राक्षे सजावटीसाठी विठ्ठल मंदिरात आणली.
यानंतर मंदिर समितीचे कर्मचारी रघु शिंदे यांनी इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने मंदिरात द्राक्षांची सजावट केली.
विठ्ठल गाभारा , रुक्मिणी माता गाभारा , चौखांबी , सोळखांबी या ठिकाणी द्राक्षे आणि त्याच्या पानांची आकर्षक सजावट केली
देवाला अर्पण केलेले दान गुप्त असावे असे म्हणत या शेतकरी भक्ताने आपले नाव जाहीर न करण्याची विनंती मंदिर समितीला केली.
या मनमोहक सजावटीमुळे विठ्ठल रुक्मिणी या द्राक्षांच्या बागेत असल्याचे आभास भाविकांना मिळाला.
सध्या आपल्या बागेत पिकलेली द्राक्षे देवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी अनेक भाविक येत असतात
image 8