PHOTO : रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर वज्रलेपन, उद्यापासून रुक्मिणी मातेच्या पायाचं दर्शन
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर वज्रलेपन करण्यात आलं आहे. रात्री मूर्तीच्या पायावर जवळपास तीन तास ही लेपन प्रक्रिया सुरु होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविठ्ठल रखुमाईच्या पायावर भक्तांकडून डोकं टेकवल्यामुळे पायाची झीज होत असल्याची माहिती समोर आलं होतं. त्यामुळे ही लेपन प्रक्रिया करण्यात आली आहे.
तसंच विठ्ठल मूर्तीची थोडी झीज झाली असून गरज वाटल्यास मूर्तीवरही लेपन करण्यात येणार आहे. भारतीय पुरातत्व विभागाचे श्रीकांत मिश्रा यांनी ही माहिती दिली आहे.
आज दुपारी उरलेली प्रक्रिया पूर्ण होणार आहे. उद्यापासून रुक्मिणी मातेच्या पायाचं दर्शन सुरु होणार असल्याची शक्यता आहे.
रुक्मिणी मातेच्या पायावरील वज्रलेप प्रक्रिया आज दुपारी पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. काल रात्री या प्रक्रियेला सुरुवात झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार रुक्मिणी मातेची खराब झालेली पावले काढून नवीन पावले बनविण्यासाठी मापे घेण्यात आली.
आज सकाळीपासून रुक्मिणीच्या गाभाऱ्या बाहेरून भाविकांना दर्शन सुरू असून देवीच्या पायाजवळ चांदीची पावले बसविली आहेत.
मात्र मंदिर प्रशासनाकडून कोणतीही माहिती दिली जात नसल्याने संभ्रमाचे वातावरण आहे.
रुक्मिणी मातेच्या पायावरील वज्रलेप निघाल्याचे वास्तव ABP माझाने समोर आणले होते.
त्यानंतर भारतीय पुरातत्व विभागाच्या पथकाने मंदिराची पाहणी केली होती. त्यांनी आषाढीपूर्वी मूर्तीवर लेपन करण्याची तयारी केली होती.