वाईचा पांडवगड चढले..अत्तराच्या वासाने संतप्त मधमाशांनी गिर्यारोहकांवर चढवला हल्ला,6 गंभीर जखमी,2 बेशुद्ध

साताऱ्यातील वाई तालुक्यातील पांडवगडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या गिर्यारोहकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
इंदापूर येथून आलेल्या गिर्यारोहकांचा एक गट आज (१० फेब्रुवारी) सकाळी पांडवगडावर ट्रेकिंगसाठी गेला होता.

गिर्यारोहकांनी लावलेल्या अत्तराच्या परफ्यूमच्या वासाने मधमाशांचे पोळे अस्वस्थ झाले आणि संतप्त मधमाशांनी थेट गिर्यारोहकांवर हल्ला चढवला.
या हल्ल्यात सहा जण गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी दोन जण बेशुद्ध पडले आहेत. गिर्यारोहक प्रशांत डोंगरे यांनी प्रशासनाला मदतीसाठी तातडीने संपर्क केला आहे.
जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्याची तयारी सुरू आहे.
गिर्यारोहणासाठी निघताना योग्य काळजी घेणे आणि प्राकृतिक वातावरणाचा अभ्यास करूनच कृती करणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.