PHOTO : कौंडण्यपुरातील रुक्मिणी मातेच्या पालखीची मंदिराभोवती प्रदक्षिणा
विदर्भ राजकन्या म्हणून ओळख असलेली अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर इथल्या श्री रुक्मिणी मातेची प्रथम पायदळ असलेली मानाची माहेरची पालखी चतुर्दशीला पंढरपूरला निघत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे परवानगी न मिळाल्याने ही रुक्मिणीची पालखी निघाली नाही. केवळ पालखीत रुक्मिणी मातेच्या पादुका घालून मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यात आल्या.
यावर्षी देखील मागील वर्षीसारखीच परिस्थिती असल्यामुळे पालखीचे नियोजित प्रस्थान झालं नाही.
मात्र मुहूर्त हुकू नये म्हणून मुहूर्तदिनी आई श्री रुक्मिणी मातेच्या पादुकांना संस्थानचे अध्यक्ष नामदेव अमाळकर, सचिव सदानंद साधू यांनी सपत्नीक अभिषेक केला, त्यानंतर भजन आणि आरती झाली.
पादुका विधीपूर्वक पालखीत घालून मंदिराला प्रदक्षिणा घातल्या आणि श्री संत सदगुरु सदाराम महाराज यांच्या समाधी जवळ ठेवण्यात आल्या.
विदर्भातील ही एकमेव पालखी मागील वर्षी आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला गेली होती.
श्री संत सदाराम महाराज यांनी इ.स 1594 साली या पालखीची सुरुवात केली होती. तब्बल 427 वर्षांची परंपरा याला लाभलेली आहे.