Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Photo : विश्व अजिंक्यपद स्पर्धेत रुद्राक्ष पाटीलचा सुवर्णपदकाचा वेध
इजिप्तची राजधानी कैरो येथे झालेल्या विश्व अजिंक्यपद (World Championship) स्पर्धेतील दहा मीटर रायफल्स स्पर्धेत पालघरच्या रुद्राक्ष पाटील (Rudraksh Patil) वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरुद्राक्ष पाटीलने विश्वविक्रम करून हे सुवर्णपदक (gold medal) मिळवलं असून 2024 मध्ये फ्रान्समध्ये (France) होणाऱ्या ऑलिंपिक (Olympic) स्पर्धेचा पहिला कोटा मिळवला आहे.
रुद्राक्ष पाटील याच्या या कामगिरीमुळे त्याचं कौतुक केलं जात आहे. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी त्याने ही कामगिरी केली आहे.
टोकियो (Tokyo) येथे झालेल्या ऑलंपिक (Olympic) स्पर्धेतील तीनही विजेत्या स्पर्धकांवर मात करत रुद्राक्ष पाटीलने सुवर्णपदकाला गवसणी घातली हे विशेष म्हणता येईल.
रुद्राक्ष पाटील हा पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि वाशी येथील आरटीओ विभागात उपायुक्त असलेल्या हेमांगिनी पाटील या दांपत्यांचा मोठा मुलगा आहे.
रुद्राक्ष पाटीलने आतापर्यंत राष्ट्रीय स्पर्धेत एकूण 20 सुवर्ण, 12 रौप्य आणि 07 रजत पदक मिळवले आहेत.
रुद्राक्ष पाटीलने खेलो इंडिया युथ स्पर्धा 2020 मध्ये सुवर्णपदक मिळवले असून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने 8 सुवर्ण, 3 रौप्य पदके मिळवत स्वतःला सिद्ध केले आहे.
रुद्राक्ष पाटील (Rudraksh Patil) सध्या सीनियर वर्ल्ड रँकिंगमध्ये सातव्या क्रमांकावर असून जुनियर वर्ल्ड रँकिंगमध्ये पहिल्या नंबरवर आहे.
कैरो येथे रायफल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून त्याने 2024 च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या पहिल्या कोट्यात स्थान मिळवले आहे.
रुद्राक्ष पाटीलची दिवसेंदिवस सुरू असलेली प्रगती पाहता आगामी ऑलम्पिक स्पर्धेमध्ये तो देशाला सुवर्णपदक मिळवून देण्यात कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास त्याचे वडील बाळासाहेब पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला आहे.