Renuka Mandir : जागर आदीशक्तीचा! माहूरच्या रेणुका माता मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरुवात

Navratri 2023 : शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. साडे तीन शक्तीपीठा पैकी मूळ पीठ असलेल्या माहूरच्या रेणुका मातेला भाविकांची गर्दी असल्याचे चित्र पाहियला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सकाळी 11.30 वाजता देवीची घटस्थापना पार पडली आहे. त्यानंतर मोठ्या संख्येने भाविकांची दर्शनासाठी उपस्थिती पाहायला मिळत आहे.

नवरात्री निमित्याने माहूरला रेणुका मातेच्या दर्शनासाठी राज्यभरातील भाविक मोठ्या प्रमाणात येथे हजेरी लावत आहेत.
नवरात्री निमित्याने माहूरचे रेणुका माता मंदिर रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.
साडेतीन शक्तीपीठांपैकी मूळ पीठ असलेले माहूरला नवरात्री निमिताने भेट देणाऱ्या भक्तगणांसाठी मंदिर प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे.
कुलदेवतेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी ही लक्षणीय असते. राज्यातीलच नाहीतर देश-विदेशातील लोक हे रेणुका मातेच्या दर्शनासाठी येत असतात.
मंदिराला रंगरोटी करण्यात आली आहे. त्याशिवाय मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने भाविकांची गैरसोय होऊ नये, म्हणून खबरदारी घेतली आहे.
रेणुका मातेच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना पिणाच्या पाण्याची आणि अन्नदानाची व्यवस्था करणात आली आहे.
मंदिर समितीतर्फे नवरात्रीच्या निमित्याने विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
आज घटस्थापनेपासून नवरात्रीला सुरुवात झाली आहे.
राज्यासह देशभरातील विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.