PHOTO: आई राजा उदो उदो...! भवानी ज्योत नेण्यासाठी तरुणांचा तुळजाईनगरीत जागर
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या मंदिरातून भवानी ज्योत प्रज्वलित करुन नेण्यासाठी सध्या तुळजापूर गजबजलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे कार्यकते प्रचंड संख्येने वाजत गाजत आईराजा उदोउदोचा गजर करत तुळजापुरात दाखल होत आहेत.
भवानी ज्योत प्रज्वलित करुन गावी रवाना होत असल्याने शनिवारी तुळजापुरात तरुणाईचा जागर दिसून आला
शनिवारी मंदिरात हजारो भवानी ज्योत प्रज्वलित करुन नवरात्रोत्सव मंडळं देविस्थापनेसाठी गावी रवाना झाले
दोन वर्षानंतर निर्बंध मुक्त वातावरणात नवरात्रोत्सव साजरा होत असल्याने यंदा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.
भवानी ज्योत प्रज्वलित करुन नेण्यासाठी गर्दी होत असल्यानं तुळजाई नगरीत पोलिसांनी सुरक्षायंत्रणा कडक केली आहे.
नवरात्रोत्सवात घटस्थापना करण्यासाठी देवीची भोगीपूजा करुन पूजेचे श्रीफळ घटस्थापना करण्यासाठी वापरण्याची प्रथापरंपरा आहे.
नवरात्रोत्सव मंडळे घटस्थापनेपूर्वी मंदिरात येऊन भोगीपूजा करुन आणि भवानी ज्योत प्रज्वलित करुन गावी नेतात
घटस्थापनेसाठी लागणारा श्रीफळ आणि भवानी ज्योत प्रज्वलित करुन नेण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे.
चांद्यापासून ते बांद्यापर्यंतचे नवरात्रोत्सव मंडळ तीर्थक्षेत्री येत आहेत.