Navratri 2022 : नवरात्रीनिमित्त रुक्मिणी माता सजली पारंपरिक दागिन्यांनी; नऊ दिवस रोज माता दिसणार विविध रूपांत
शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त विठ्ठल मंदिरात मोठ्या उत्साहात कार्यक्रमांना सुरुवात झाली झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज घटस्थापनेला रुक्मिणी मातेस विविध हिरेजडित पारंपरिक दागिन्याने नटविण्यात आले होते.
नवरात्र महोत्सवानिमित्त विठुरायालाही मौल्यवान रत्नजडित दागिन्यात सजविण्यात आलेले असून विठ्ठल रुक्मिणीचे हे अनोखे रूप पाहण्यासाठी राज्यभरातून हजारो भाविकांनी गर्दी केली आहे.
उद्या सायंकाळपासून आता रोज परंपरेप्रमाणे ठेवणीतील मौल्यवान दागिन्याने रोज नऊ दिवस रुक्मिणी मातेला विविध रूपात सजविण्यात येणार आहे.
आजच्या पहिल्या दिवशी देवीला दागिन्यांचे अनोखे रूप देण्यात आले होते. यामध्ये सोन्याचा मुकुट, तानवड, जवेच्या माळा, जवमणी पदक, मोहोरी आणि पुतळ्याची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा, चिंचपेटी असे सुवर्णजडित हिऱ्यांचे पंधरा दागिने घालण्यात आले आहेत.
विठुरायाला सजवतानाही सुवर्ण मुकुट, कौस्तुभ मणी, दंडपेट्या, हिऱ्यांचे कंगन, मोत्यांच्या कंठी, मारवाडी पद्धतीचा मोती हार, सुवर्ण तुळशीमाळ, मोत्याचा तुरा, शिरपेच आणि तोडे जोड परिधान करण्यात आले आहेत.